---Advertisement---
मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका तरुणाने प्रेमप्रकरणातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली केल्याची घटना घडली आहे. रहदारी असलेल्या रस्त्याच्या मधोमध तरुणाने स्वतःवर गोळी झाल्याने परिसरात एकाच खडबड उडाली. तरुणसोवबतच्या मित्रांनी हे दृश्य पाहताच तेथून पळ काढला.
याबाबत माहिती अशी कि, मध्य प्रदेशातील मुरैना येथील आंबा परिसरात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास काही जण तीन दुचाकीवर बाजार परिसरात आले. यात मृत तरुण गौरव साखवरचे, व त्याचे वडीलहि होते. दुचाकीवरून उतरून तरुण फोन वर कुणाशी तरी बोलत असताना त्याने अचानक त्याच्याकडील बंदूक काढून स्वतः वर गोळी झाडून घेतली. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
दरम्यान तरुणासोबत आलेल्या त्याच्या मित्रांनी हि घटना पाहताच तेथून पळ काढला . घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हि घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचे बोलले जात आहे. फोनवर कोणाशी तरी बोलत असताना त्याने आत्महत्येची धमकी दिली आणि शहरात पोहोचताच स्वत:वर गोळी झाडून घेतली. पोलिसांना घटनास्थळावरून एक पिस्तूल आणि रिकामी काडतुसेही जमा केले आहेत.
दरम्यान पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु असून या प्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीयांचे जबाबही घेतले जात आहेत. गौरव हा व्यवसायाने प्लंबर असून तो टॅप फिटिंगचे काम करायचा.
---Advertisement---
