---Advertisement---

तिकीट मागतांना ‘हिंदी’तच बोला, रेल्वे कर्मचार्‍याची जबरदस्ती; नाहूर रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?

by team
---Advertisement---

मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृत्वात अलिकडेच  केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.  परंतु  मुंबईत वारंवार मराठी माणसांचा अवमान करणारे प्रकार घडत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, असाच काहीसा प्रकार मुंबईतील नाहूर रेल्वे स्थानकात घडला आहे. मराठीत तिकीट मागितले असता हिंदीतच बोला, अशी जबरदस्ती नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचार्‍याने केल्याच्या प्रकार समोर आला आहे. अमोल माने या प्रवाश्याशी हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

अमोल माने हे नाहूर स्थानकात लोकलचे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीत बोलू लागले. मात्र त्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोला, असे अमोल माने यांना सांगितले. मात्र मी मराठीतच बोलणार, असा आग्रह माने यांनी केला असता त्या कर्मचाऱ्याने उद्धट बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान, याचा व्हिडिओ माने यांनी मोबाईलमध्ये काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर  त्यांनी या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार ही केली आहे.

मराठी एकीकरण समितीने यात हस्तक्षेप करत रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेचा अवमान होणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment