---Advertisement---
Adani Group Stocks: अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. अदानी समूहाच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 2.53 अब्ज डॉलरने घसरले होते , मात्र बुधवारी कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिले.
शेअर बाजारात आज उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.अदानी ग्रीन एनर्जीसह अदानी ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर या घडामोडी पाहायला मिळाल्या.
अदानी समूहाने कंपनीचे अध्यक्ष गौतम अदानी, सागर अदानी आणि अमेरिकेतील अदानी ग्रीनचे सीईओ एमडी विनीत जैन यांच्यावरील आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आरोपपत्रात गौतम अदानी यांच्यासह कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांची नावे नसल्याचे कंपनीने स्पष्टपणे सांगितले.
या वृत्तानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली.
अदानी एंटरप्रायझेस : 6.02 टक्के
अदानी एनर्जी सोल्युशन्स : 9.70 टक्के
अदानी टोटल गॅस लिमिटेड : 8.81 टक्के
अदानी पोर्ट्स : 2.91 टक्के
अदानी विल्मरचे शेअर्स 4.67 टक्के
अदानी पॉवरचे शेअर्स 7.88 टक्के
एसीसी सिमेंटचे शेअर्स 1.96 टक्के
अबुंजा सिमेंटचे शेअर्स 2.29 टक्के
NDTV शेअर्सनी 4.38 टक्के
दरम्यान, मानांकन संस्था मुडीजनं अदानी ग्रुपच्या 7 कंपन्यांचं रेटिंग स्थिरवरुन नकारात्मक केलं होतं. अदानी ट्रान्समिशन स्टेप वन लिमिटेड, अदानी ट्रान्सपोर्टेशन , अदानी पोर्टस अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड,अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, अदानी इंटरनॅशनल कंटेन टर्मिनल या कंपन्यांच्या रेटिंगबाबत मुडीजनं निर्णय घेतला आहे.