Vi Recharge Plan : व्होडाफोन आइडिया (Vi) ही देशातील सर्वात मोठी खाजगी दूरसंचार कंपन्यांपैकी एक आहे. Jio, Airtel, Vodafone Idea ने जुलै 2024 मध्ये त्यांच्या दरात वाढ केली आहे. खासगी कंपन्यांनी दर महाग केल्यानंतर अनेक मोबाईल फोन वापरकर्ते सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळले. आता Vodafone Idea ने आपला 289 रुपयांचा जुना प्लान पुन्हा आणला आहे.
जुना प्लान सदारकरताना किंमत वाढवण्याऐवजी, Vi ने 289 रुपयांच्या प्लॅनची वैधता कमी केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीचे हे एक स्मार्ट पाऊल आहे, म्हणजेच प्लॅनची किंमत थेट वाढवण्याऐवजी कंपनीने वैधता कमी केली. 289 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यापूर्वी ग्राहकांना 48 दिवसांची वैधता दिली जात होती. प्लॅनमध्ये ग्राहकांना 4GB डेटा आणि 600SMS देखील मिळत आहे.
व्होडाफोन आयडियाच्या 289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 4GB डेटा, 600SMS उपलब्ध आहेत. Vi च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना आता या रिचार्ज पॅकमध्ये ४८ दिवसांऐवजी ४० दिवसांची वैधता मिळेल. म्हणजेच आता ग्राहकांना प्रतिदिन ७.२२५ रुपयांऐवजी ६.०२ रुपये मोजावे लागणार आहेत.
Vodafone Idea चा हा प्लान अशा लोकांसाठी देखील आहे ज्यांना जास्त डेटाची गरज नाही आणि सेवा फक्त अल्प कालावधीसाठी चालू ठेवायची आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ देखील त्यांच्या ग्राहकांना अशा योजना ऑफर करतात. Voda च्या प्लॅनमध्ये उपलब्ध 4GB डेटा संपल्यानंतर, कंपनी 50 पैसे प्रति एमबी आकारते.
Vodafone ग्राहकांना हवे असल्यास, ते अधिक डेटा मिळविण्यासाठी कंपनीने ऑफर केलेले Vi डेटा व्हाउचर रिचार्ज करू शकतात.