Sawariya Seth Mandir: मेवाडच्या सांवरिया सेठ मंदिरात दानाचा विक्रम नोंदविण्यात आला आहे. दोन महिन्यांत सांवरिया सेठ मंदिरात सुमारे 35 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. यावेळी विक्रमी पैशांसोबत 2 किलो सोने, सुमारे 188 किलो चांदी आणि अनेक देशांचे चलनही सापडले आहे.
गतवर्षी दोन महिन्यात सुमारे १७ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले होते. सांवरिया सेठ मंदिरात दर महिन्याला चतुर्दशीला दानपेट्या उघडल्या जातात, मात्र यंदा दिवाळीत दानपेटी उघडण्यात आली नाही. अशा परिस्थितीत 2 महिन्यांनंतर दानपेट्या उघडण्यात आल्या आहेत.
सांवरिया सेठच्या दरबारात सोने-चांदीचे दानही मोठ्या प्रमाणात आले आहे. मंदिरात 2 किलो 290 ग्रॅम सोने आणि 58 किलो 900 ग्रॅम चांदी दान म्हणून आले आहे. तसेच भेट कक्षामध्ये 504 ग्रॅम 560 मिलीग्रॅम सोने आणि 128 किलो 930 ग्रॅम चांदी आली आहे. दोन महिन्यांत एकूण 2 किलो 794 ग्रॅम 560 मिलीग्राम सोने आणि 187 किलो 9 ग्रॅम चांदी दान आले आहे. मंदिरातील दानाची मोजणी 6 फेऱ्यांमध्ये (दिवस) पूर्ण झाली.
9 कोटींहून अधिक रकमेच्या मनी ऑर्डर
भाविकांनी ऑनलाईन व मनी ऑर्डरद्वारे 9 कोटी 30 लाख 27 हजार 427 रुपये कार्यालयात जमा केले आहेत. यानंतर एकूण 34 कोटी 91 लाख 95 हजार 68 रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे.