IND vs AUS: बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने 141 चेंडूत 17 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 140 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. या सामन्यात सिराजने ट्रॅव्हिस हेडला यॉर्कर बॉलवर क्लीन बोल्ड केले होते .दरम्यान विकेट पडल्यानंतर सिराज आणि हेड यांच्यात बाचाबाची झाली होती ज्याचा व्हिडिओ सोशल माडियावर चांगलाच व्हायरल झाला. विकेट घेतल्यानंतर सिराज ट्रॅव्हिस हेडला चल निघ बोला… यावर हेड पण कायतरी बोलून तेथून निघून गेला. असं या व्हिडिओत दिसत आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हेडने पत्रकार परिषदेत सिराजच्या चांगल्या गोलंदाजीचे कौतुक केल्याचा दावा केला होता. पण बदल्यात मला मिळालेली वागणूक चुकीची होती, मी निराश झालो आहे, असे तो म्हणाला. सिराजने त्याच्या वक्तव्याचे लगेच खंडन केले. सिराजने सांगितलं की हेड खोटं बोलत असून तो असं काही म्हटलाच नव्हता. खेळाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही खेळाडू हे प्रकरण मिटवताना दिसले. सिराजने फलंदाजी करताना हेडशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर हा वाद संपल्याचे मानले जात आहे.
मात्र आता या प्रकरणामुळे दोघांवरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कारवाई होण्याची शक्यता आहे.द टेलिग्राफच्या वृत्तानुसार सिराज आणि हेड यांना मैदानातील बाचाबाचीसाछी आयसीसीकडून वॉर्निंग दिली जाऊ शकते. तथापि, त्यांच्यावर बंदीइतपत कडक कारवाई होणार नाही. पण अशा घटनांसाठी दंड ठोठावला जातो आणि डिसिप्टनरी रेकॉर्डमध्ये डिमिरीट पाँइंट दिला जातो. त्यामुळे सिराज आणि हेड यांनाही दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.