CUET Exam 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, आता त्यांना सीयूईटी (CUET )मध्ये कोणत्याही विषयात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विध्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये संधी मिळवण्यासाठी मदत होणार आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या 12 वीच्या विषयाशी संबंधित नसलेल्या कोणत्याही विषयात सीयूईटी यूजी परीक्षा देण्याची संधी मिळेल.
सीयूईटी म्हणजे कॉमन यूनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. यामध्ये भारतीय केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकाच परीक्षा प्रणालीतून चाचणी दिली जाते. यामध्ये साहित्य, विज्ञान, गणित, वाणिज्य इत्यादी विविध विषयांचा समावेश केला जातो, आणि ते विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकतात.
महत्त्वाचे बदल
सीयूईटी प्रश्नपत्रिकेत प्रश्नांची निवडकता समाप्त केलीआहे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक पेपरसाठी एक तासाचा समान वेळ दिला जाईल. सीयूईटी परीक्षा आता फक्त संगणकावर होणार आहे. 2024 मध्ये 63 विषयांचा समावेश होता,मात्र आता ती संख्या कमी करून 33 केली आहे. प्रत्येक पेपर 90 मिनिटांचा असेल. 2024 पर्यंत पेपर 105 मिनिटांचा होता. या परीक्षेमध्ये 157 विषय असतील, त्यात 26 संस्कृत विषयांचा समावेश असेल.
यामुळे, विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक समान आणि सुगम मार्ग मिळाला आहे. यामुळे त्यांना विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास करतांना अधिक संधी मिळेल.