अवघ्या काही दिवसांत जुनं वर्ष संपून नवीन वर्षाचं आगमन होणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि आपल्या प्रियजनांसोबत हर्षोल्लासाने हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी विविध योजना आखत आहे. काही लोकं नव्या वर्षासाठी काही खास ठिकाणं शोधत आहेत, तर काही लोक एन्जॉय करण्याच्या विविध प्रकारांच्या शोधात आहेत. तसेच वर्षाचा आढावा घेत आहेत.
अशाच प्रकारे वर्षाच्या अखेरीस आपल्या गुगल सर्चचा आढावा घेत आहे. यात गुगलने 2024ची एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत 2024मध्ये कोणत्या विषयांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला, कोणत्या व्यक्ती, ठिकाणं, जेवण, रेसिपी, खेळ, गाणी, संगीतकार शोधले गेले याचा समावेश आहे. जगभरातील आणि देशानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा कल कोणत्या गोष्टीत अधिक होता. त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या हे समजणं सोपं झालं आहे.
सर्वाधिक सर्च केलेल्या 10 अभिनेत्री/अभिनेता (2024 मध्ये) :
केट विल्यम्स, पवन कल्याण, अॅडम ब्रेडी, एला पर्नेल, हिना खान, कायरन चुलकिन, टेरेंस हावर्ड, निमरत कौर, शाटन फॉस्टर, ब्रिगेट बज्जो
हिना खान:
हिना खान सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे आणि तिच्या आरोग्याबद्दल सोशल मीडियावर अपडेट्स शेअर करत असते. ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जी अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करुन प्रसिद्ध झाली आहे. हिना खानला तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील संघर्षांसाठी देखील चर्चेचा विषय बनलेली आहे.
निमरत कौर:
निमरत कौर सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या वादग्रस्त वक्तव्यानुसार, तिने ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बाबतीत आरोप केले होते. हे आरोप आणि तिची प्रसिद्धी या सर्व कारणांमुळे तिचं नाव 2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत आहे.
गुगलच्या या यादीतून हे स्पष्ट होतं की, या वर्षी काही अप्रत्याशित कारणांमुळे हिना खान आणि निमरत कौर यांचे नाव चर्चेत आले आणि त्याचबरोबर इतर नावेही या यादीत समाविष्ट झाली आहेत. 2024 मध्ये या अभिनेत्रींच्या जीवनातील काही घटनांमुळे त्यांच्या नावांची मोठ्या प्रमाणावर सर्चिंग झाली आहे.