---Advertisement---

Reliance Jio ने २०२५ नवीन वर्षाचे स्वागत रिचार्ज प्लॅन लाँच केले: फायदे, वैधता आणि बरेच काही

by team
---Advertisement---

मुंबई : रिलायन्स जिओने आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धमाकेदार रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. नव्या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून जिओ ग्राहकांना २,०२५ रुपयात ग्राहकांना ४,३०० रुपयांचे फायदे मिळणार आहेत. दरम्यान, रिलायन्स जिओने आपल्या दरवर्षीच्या न्यू ईयर प्लानची परंपरा कायम ठेवत यंदाही जबरदस्त प्लॅन बाजारात आणला आहे.

दरम्यान, जिओच्या या रिचार्ज पॅकची किंमत केवळ २,०२५ रुपये असून या किंमतीत ग्राहकांना ४,३०० रुपयांचे फायदे मिळणार आहेत. जिओ ग्राहकांसाठी नवा ‘New Year Welcome Plan’ मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. नव्या रिचार्ज पॅकची मुदत केवळ एक महिन्याकरिता म्हणजेच दि. ११ डिसेंबर २०२४ ते दि. ११ जानेवारी २०२५ पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

जाणून घ्या, जबरदस्त रिचार्ज प्लॅनची वैशिष्ट्ये आणि किंमत : –

नवीन वर्षानिमित्त विशेष जिओ प्लॅनची मुदत – दि. ११ डिसेंबर २०२४ ते ११ जानेवारी २०२५ पर्यंत असेल.

जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी २०० दिवस आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन २.५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे.

जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी २०० दिवस आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन २.५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे.

यूजर्स एकूण ५०० जीबी ४ जी डेटा या प्लॅनमध्ये वापरू शकणार आहेत.

जिओ ग्राहकांना या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड 5G नेटवर्कची सुविधा मिळणार आहे.

जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100SMS प्रत्येक दिवशी ऑफर केले जातील.

या रिचार्ज पॅकमध्ये २१५० रुपयांचे पार्टनर कूपन मिळतात.

५०० रुपयांचे AJIO कूपन मिळतील, जे २५०० रुपयांच्या वरती खरेदीवर वापरता येतील.

१५० रुपयांचे स्विगी कूपन जे ग्राहक कमीत कमी ४९९ च्या ऑर्डरच्या वरती वापरू शकतात.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment