---Advertisement---

Ram Shinde : अखेर राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड

---Advertisement---

मुंबई ।  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील केला आहे. या विस्तारात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता भाजपने आपले राजकीय गणित अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

भाजपने नेते प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड केले आहे. यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेतील प्रभाव वाढला आहे, आणि हे पाऊल राज्यातील राजकीय बदलांच्या संदर्भात महत्त्वाचे मानले जात आहे.

राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून निवड ही भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे. रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त होते. १८ डिसेंबर  रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या पदासाठी अर्ज करण्याची मुदत दिली गेली होती.

१९ डिसेंबर रोजी निवडणूक होणार होती. परंतु, या पदासाठी केवळ राम शिंदे यांचाच अर्ज दाखल झाला. त्यामुळे भाजप नेते राम शिंदे यांची विधानपरिषदेचे सभापतीपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदाची माळ  भाजपच्या गळ्यात पडली.

या निर्णयानंतर विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवड एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता. शिवसेनेने निलम गोऱ्हे यांना सभापतीपदासाठी इच्छुक केले होते आणि त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. तथापि, विधानपरिषदेतील संख्याबळाचा विचार करत भाजपने त्यांच्याकडे हे पद ठेवले आणि त्यासाठी राम शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment