---Advertisement---

मालेगावात बनावट जन्मदाखल्यांचा प्रकार; 1500 बांगलादेशींची नोंद, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

by team
---Advertisement---

मालेगाव : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी, मालेगाव हे रोहिंग्यांचे आश्रयस्थान झाले आहे. आपल्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत. मालेगावातून व्होट जिहाद सुरु असून मालेगावात १५०० बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखला देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मालेगावात झालेल्या नमको बँक १२५ कोटी अपहार प्रकरणात चौकशीसाठी किरीट सोमय्या सोमवारी मालेगावात दाखल झाले. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. त्यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश द्यावेत व मालेगावातील बांगलादेशी आणि रोहिंग्यांची पडताळणी करण्याचे काम एटीएसने करावे, अशी मागणी करणार आहोत.

अधिकाऱ्यांकडून चूक मान्य

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातून आणि आयुक्त कार्यालयातून हे दाखले देऊन टाकला आहे. त्यावर एकाच पत्ता आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यासाठी जन्म दाखला देण्याचा हा प्रकार आहे. मालेगाव तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त यांनी आपली चूक मान्य केली आहे. अनवधानाने हे जन्मप्रमापत्र देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहेत. ज्यांना प्रमाणपत्र दिले आहे त्यांची परत चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment