नवी दिल्ली : सुरक्षा मंत्रालयाने २०२५ हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकार्याने सांगितले की, २०२५ मध्ये संरक्षण मंत्रालय सायबर आणि अंतराळसारख्या क्षेत्रांवर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेल. लष्करी क्षमतेच्या जलद विकासासाठी संपादन प्रक्रिया सुलभ आणि कालबद्ध करेल. संरक्षण सुधारणांमुळे युनिफाईड लष्करी कमांड स्थापन करणे सुलभ होईल, असे संरक्षण मंत्री Rajnath Singh राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
Rajnath Singh : सशस्त्र दलांना बहु-डोमेन इंटिग्रेटेड ऑपरेशन्स करण्यास सक्षम असलेल्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि युद्धासाठी तयार दलांमध्ये बदल घडवण्यासाठी उपाय लागू केले जातील. २०२५ मध्ये सायबर आणि अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, हायपरसोनिक्स आणि रोबोटिक्ससारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती संरक्षणमंत्रालयाने निवेदनात दिली.
आधुनिकीकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा
संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले की, सुधारणांचे वर्ष हे सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल असेल. देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये अभूतपूर्व प्रगतीचा पाया रचला जाईल आणि अशा प्रकारे २१व्या शतकातील आव्हानांमध्ये राष्ट्राची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्याची तयारी होईल. संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत २०२५ हे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत बचावापेक्षा बरेच काही करण्याच्या स्थितीत : आनंद महिंद्रा
भारत आपली क्षमता वाढवण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळी व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी जागतिक आघाड्यांवर बदलाच्या संधीचा फायदा घेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली. भारत बचावापेक्षा बरेच काही करण्याच्या स्थितीत आहे, असेही त्यांनी सांगितले.