---Advertisement---

जिजाऊंच्या संस्कारांचा आणि विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श जोपासा : मंत्री गुलाबराव पाटील

by team
---Advertisement---

जळगाव : “राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारातून छत्रपती शिवरायांसारखे पराक्रमी नेतृत्व घडले. जिजाऊंसारख्या मातांच्या कर्तृत्वामुळे आजही समाजाला प्रेरणा मिळते. तसेच स्वामी विवेकानंद यांची शिकवण युवकांना स्वावलंबन, नेतृत्व आणि समाजसेवेची दिशा देते. जिजाऊंच्या आणि विवेकानंदांच्या विचारांवर आधारित समाज उभारणीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. “जिजाऊंच्या संस्कारांचा आणि विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श जोपासण्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धानवड येथे जयंती व रस्ते भूमिपूजन निमित्त आयोजित  कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि.का.सोसायटी चे माजी चेअरमन अर्जुन चौधरी  हे होते.

सुरुवातीला जयंतीनिमित्त मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रमाता मासाहेब  जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  सूत्रसंचालन तालुका प्रमुख शिवराज पाटील  यांनी केले. तर आभार  सरपंच संभाजी पवार यांनी मानले.

या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, भाजपाचे चंद्रशेखर अत्तरदे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे,  शेतकी संघाचे अध्यक्ष ब्रिजलाल  पाटील, सरपंच संभाजी पवार,  उपसरपंच शांताबाई चव्हाण, दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, समन्वयक देविदास कोळी, संदीप बिर्हाडे, विजय लाड, अतुल घुगे, चेतन पोळ, नामदेव पाटील, प्रभुदास पाटील, युवासेनेचे स्वप्नील परदेशी, ग्रा.पं. सदस्य दिलीप पाटील,  हरिलाल शिंदे,  यशोदाबाई राठोड,  गिताबाई चव्हाण,  बाबुलाल पाटील, सोसायटीचे रतन चव्हाण संदीप सोनवणे,  श्रीराम पाटील, अमोल पाटील, भूषण पाटील,  अविनाश पाटील , विकास पाटी,  नगरसेवक मनोज चौधरी,  शाम कोगटा,  स्थानिक लोकप्रतिनिधी, महायुतीचे  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी व युवकांमार्फत  गुलाबभाऊंचा सत्कार !

कुसुंबा ते धानवड हा 08 किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर केल्याबद्दल येथील शेतकरी,  युवक, ग्रामपंचायत व सोसायटी मार्फत मंत्री गुलाबभाऊंचे सत्कार शाल श्रीफळ व बुके देवून  करण्यात आला. तर धानवड येथील भूषण पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांची पोलीस कर्मचारी पदी निवड झाल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment