---Advertisement---

Mahesh Kothe : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास

by team
---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यादरम्यान गेले असताना त्यांचे निधन झाले. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे.

महेश कोठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापुरातील दिग्गज नेते आहेत. नुकतीच त्यांनी विधानसभा निवडणूक सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. महेश कोठे यांच्या निधनाचे वृत्त येताच कोठे यांच्या मुरारजी पेठेतील घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

महेश कोठे यांनी 2021 मध्ये शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर महेश कोठे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सोलापूर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे हे विजय देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते.

महेश कोठे यांचे कुटुंब आणि राजकीय वारसा

महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे सध्या सोलापूरचे आमदार आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय वारशाचा महत्त्वपूर्ण भाग महेश कोठे होते. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या राजकारणात मोठा शोकसागर पसरला आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment