जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असून, गुरुवारी सोन्याचा दर प्रति तोळ्यासाठी ९०० रुपयांनी वाढला तर चांदी प्रति किलोला २ हजार रुपयांनी महागली. जळगाव सराफ बाजारात सोन्याचा विनाजीएसटी दर ७९,७०० रुपये प्रति तोळा झाला असून जीएसटीसह तो ८२,१०० रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीच्या दरानेही ९३,००० रुपयांचा टप्पा गाठला आहे. ही वाढ एचएमपीव्ही व्हायरस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणांमुळे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ७८,८०० रुपयांवर होता, मात्र दोन दिवसांत १,१०० रुपयांनी वाढून ७९,७०० रुपये झाला. तसेच, चांदी दरातही सातत्याने वाढ होत आहे.
दरम्यान, आगामी काळात सोन्याचा दर ८५,००० ते ९०,००० रुपयांपर्यंत तर चांदीचा दर १,१०,००० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ऐन लग्नसराईच्या काळात या वाढत्या भावामुळे ग्रा