---Advertisement---

Beed Crime : बीडमध्ये चाललंय तरी काय ? जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक

by team
---Advertisement---

Beed Crime: बीड जिल्ह्यामध्येच तीन सख्खा भावांवर जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले अशी मयतांची नावे आहेत. तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे. या घटनेमधील सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या दोन्ही गटांतील वादाचे मूळ जुन्या गुन्हेगारी पार्श्वभूमीत आहे. दोन्ही गटांवर जबरी चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे सोलापूर आणि नगर येथे दाखल आहेत. चोरीच्या वाटणीतून हा वाद उद्भवल्याचा पोलिसांना संशय आहे.

वाहिरा येथील पारधी वस्तीवर हातोळण गावातील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, आणि कृष्णा विलास भोसले हे तिन्ही भाऊ आले होते. गुरुवारी दुपारपासून पारधी समाजातील लोकांमध्ये वाद सुरू होता. या वादाचे रुपांतर रात्री भीषण हल्ल्यात झाले. लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात अजय आणि भरत यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी वरिष्ठांना कळवले. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तपासाच्या सूचना दिल्या. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली.

आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे आणि हत्येचे नेमके कारण शोधले जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment