---Advertisement---

दुर्दैवी ! अचानक नीलगायांचा कळप आला; बैलगाडी थेट विहिरीत पडली, दोन्ही बैल ठार

---Advertisement---

जळगाव ।  जामनेर तालुक्यातील खांडवे गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या अरुण पर्वते या शेतकऱ्याची बैलगाडी आणि बैल जोडी विहिरीत पडली. या घटनेत बैल जोडीचा मृत्यू झाला असून, यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

खांडवे येथील अरुण पर्वते हे नेहमीप्रमाणे चारा आणण्यासाठी बैलगाडीसह शेतात गेले होते. त्यांनी बैलगाडी शेतात उभी केली असता अचानक नीलगायांचा कळप वेगाने धावत आला. या भीतीने बैलगाडीला जुंपलेली बैल जोडी धावू लागली आणि थेट बैलगाडीसह जवळच्या विहिरीत कोसळली.

जिवीत व आर्थिक हानी 

या घटनेत बैल जोडीचा जागीच मृत्यू झाला. जेसीबीच्या साहाय्याने विहिरीतून बैलगाडी व बैलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. बैल जोडीच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर 

ही घटना शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे. अरुण पर्वते यांचे कुटुंब या घटनेमुळे हतबल झाले आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासकीय मदतीची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment