---Advertisement---

पुण्यात ‘या’ आजाराचे थैमान! आढळले २२ रुग्ण, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

by team
---Advertisement---

पुणे शहरातील नागरिक सध्या एका मोठ्या दुर्मिळ आजाराचे अनेक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे चे २२ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्च येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तेथील तपासणीअंती या आजाराचा निष्कर्ष निघेल.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काही रुग्णांना दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्णांना दाखल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातून, गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची काही प्रकरणं पुणे महानगरपालिकेकडे नोंदवली गेली आहेत. शहरातील या दुर्मिळ विकाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेतर्फे बाधित भागात एक टीम पाठवण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांचे महत्त्वाचे विधान

नेमका आहे तरी काय हा आजार?

‘गुईवेल सिंड्रोम’संदर्भात ‘एनआयव्ही’ इंस्टिट्यूट म्हणजेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’चा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहे त्या भागात महापालिकेकडून टीम नियुक्त केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘गुईवेल सिंड्रोम’ हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. म्हणजेच हा मज्जासंस्थेशीसंबंधित एक आजार असून तो एक लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळून येतो. वेगळ्या पद्धतीच्या लसी घेतल्या असतील किंवा ‘एच वन एन वन’च्या लस घेतली असेल तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

६ रुग्ण पुणे शहरात तर १६ बाहेरील

‘गुईवेल सिंड्रोम’चं निदान करण्यासाठी ‘स्पाइनल फ्लूड’ची चाचणी केली जाते. ‘गुईवेल सिंड्रोम’वरील उपचार हे महागडे असून यामध्ये उपाय म्हणून ‘प्लाजमा एक्सचेंज’सारखी पद्धत वापरली जाते. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नाही. सध्या पुण्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी पुणे शहरात एकणू ६ रुग्ण आहेत. तर उर्वरित १६ रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील इतर वेगवेगळ्या भागांमधील आहेत. यासंदर्भातील माहिती आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे.

हा आजार संसर्गजन्य आहे का?

पुण्यात आढळून आलेले ६ रुग्ण उपचारासाठी पुण्यात आलेले होते. त्यामुळे सर्वच रुग्ण हे पुणे शहराच्या बाहेरील आहेत, असं स्पष्ट होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा आजार संसर्गजन्य नसल्याने त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या पुण्यामधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या रुग्णांची तपासणी केली जात आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये ‘गुईवेल सिंड्रोम’चे हे रुग्ण होते त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment