जळगाव : शहरातील ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये संशयित जळगाव महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे अद्याप फरार आहेत. महाजन यांना औरंगाबाद खंडपीठाने ७ दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
हे प्रकरण २ डिसेंबर २०२४ रोजी उघड झाले होते, जेव्हा जळगाव महापालिका मालकीची जुनी पाईपलाइन जेसीबीच्या सहाय्याने काढली जात होती आणि चोरीचा प्रयत्न केला जात होता. या घटनेच्या माहितीवर आधारित जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानंतर अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड आणि नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!
सदर गुन्ह्यातील सुनील महाजन यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले, आणि ते प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. यानंतर, महाजन यांच्या विरोधात २ अधिक वेगळ्या गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला.
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
सध्या, सुनील महाजन हे फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. महाजन यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू केली असून, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडपीठाच्या न्यायाधीश न्या. पेडणेकर यांनी सुनील महाजन यांना ७ दिवसांच्या अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. महाजन यांच्यातर्फे अँड. सागर चित्रे आणि अँड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले आहे.