---Advertisement---

कच्च्या मालाची निर्यात करून विकास शक्य नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

by team
India-Pakistan ceasefire

---Advertisement---

भुवनेश्वर : देशातून कच्च्या मालाची निर्यात करून तयार उत्पादनांची आयात स्वीकारार्ह नाही. कच्च्या मालाची निर्यात करून देशाचा विकास शक्य होणार नाही. देशाला विकासाचे इंजिन बनवायचे असल्यास वस्तूंची निर्मिती देशातच व्हायला हवी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.

ओडिशाची राजधानी भुनवेश्वर येथील जनता मैदानात आयोजित ‘उत्कर्ष ओडिशा, मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटनानंतर संबोधित करताना मोदी म्हणाले, देशातून खनिजे काढली जातात आणि उत्पादननिर्मितीसाठी त्याची निर्यात केली जाते. तयार झालेल्या उत्पादनांची देशात आयात केली जाते. याला आळा घालणे गरजेचे आहे. कोट्यवधी जनतेच्या प्रयत्नामुळे भारत विकासाच्या दिशेने अग्रेसर आहे. भारतीयांची आशा, आकांक्षा देशाची शक्ती आहे. केवळ कच्च्या मालाची निर्यात करून देश विकसित होणार नाही. संसाधनांचा वापर देशातच वस्तूंची निर्मिती करण्यासाठी व्हायला हवा. सध्याचे युग एआय अर्थात् कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. त्यामुळे आपल्याला नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर देशाच्या विकासासाठी करायचा आहे. गेल्या दशकात कोट्यवधी लोक सर्वच स्तरावर सक्षम बनले, ओडिशा त्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे मोदी म्हणाले.

ईशान्य भारत विकासाचे इंजिन

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधेला महत्त्व आहे. आसियान देशांनी ओडिशात उद्योग उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी ईशान्य भारताला विकासाचे इंजिन मानतो, ज्यामध्ये ओडिशा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या नेतृत्वात ओडिशा लवकरच विकासाची नवी उंची गाठेल.
संशोधनाला सरकारचे प्राधान्य

संशोधन, कौशल्य आणि नवोपक्रम ही काळाची गरज आहे. सरकार संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी योजनांवर काम करीत आहे. यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला. भारताला तिसरी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी उद्योगांनी सरकारसोबत काम करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---