---Advertisement---

Washington plane crash: अमेरिकेत प्रवाशी विमानाची हेलिकॉप्टरला धडक, पहा अपघाताचा VIDEO

by team
---Advertisement---

अमेरिकन एअरलाइन्सचं विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टचा एकमेकां धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात  अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये झाला आहे. 

या प्रवाशी  विमानात ६४ प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. लँडिंग करताना प्रवाशांनी भरलेले  हे विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकले. अपघातानंतर विमान नदीमध्ये पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

अपघातानंतर घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. ज्या हेलिकॉप्टरला विमानाने धडक दिली ते हेलिकॉप्टर अमेरिका लष्कराचे होते. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय.  या अपघातानंतर रीगन नॅशन एअरपोर्ट बंद करण्यात आले आहे. ही घटना घडली त्या एअरपोर्ट आणि व्हाइट हाऊसमध्ये फक्त ३ किलोमीटरचे अंतर आहे.

हेही वाचा : धक्कादायक! मुलांनीच संपवलं आईच्या बॉयफ्रेंडला, रस्त्यावरच केला थरारक हल्ला

पोटोमॅक नदीत शोध आणि बचाव कार्य सुरु आहे. यात यूएस पार्क पोलिस, डीसी मेट्रोपॉलिटन पोलिस विभाग आणि अमेरिकन सैन्यासह अनेक एजन्सींचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डीसी फायर आणि ईएमएस विभागाने म्हटले आहे की अग्निशमन नौका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्येच उपस्थित होते. हा अपघात आहे की घातपात याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment