---Advertisement---

संत मुक्ताबाई समाधीस्थळ पंचक्रोशी परिक्रमेला सुरुवात; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतले दर्शन

---Advertisement---

मुक्ताईनगर : श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे दरवर्षी माघ महिन्यातील शुद्ध प्रतिपदा, धर्मनाथबीज पावनपर्वानिमित्त “संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र महतनगर पंचक्रोशी परिक्रमा” मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात येत असते. यंदा ही परिक्रमा ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान पार पडत असून, या प्रस्थान सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

या प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे आणि व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव महाराज जुणारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिक्रमेच्या माध्यमातून संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्षेत्राची महती अधोरेखित करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशी परिक्रमा मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असून, राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक यात सहभागी होत आहेत.

परिक्रमेच्या मार्गावर विविध ठिकाणी भक्तांसाठी अन्नछत्र आणि सेवा कार्ये राबविण्यात येत आहेत. संत मुक्ताबाई यांच्या भजना-कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment