केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून यात गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प विशेष मानला जात आहे. यात शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजनेसह किसान क्रेडिटकार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कर्करोगाची औषधे, मोबाईल बॅटरी, विणकरांनी बनवलेले कपडे, चामड्याच्या वस्तू, मोबाईल फोन, एलईडी आणि एलसीडी टीव्ही आणि इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार असल्याची घोषणा केली. तर आयात केलेल्या मोटारसायकली, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट्स, पॅनेल डिस्प्ले आणि प्रीमियम टीव्ही महाग होणार असल्याचे म्हटले.
दरम्यान, अर्थसंकल्पात कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कर्करोग केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेला पाठिंबा देत कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कर्करोगाच्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी ही योजना चांगली असून आता कर्करोगासह इतर गंभीर आजारांवरील 36 औषधे ड्युटी फ्री केली आहेत. त्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळणार आहेत. सगळ्यांसाठीच ही एक दिलासादायक घोषणा आहे.