---Advertisement---

Eknath Shinde: शिरीष महाराजांचं कर्ज उपमुख्यमंत्री शिंदेंनी फेडलं, वाढदिनी केलं समाजकार्य

by team
---Advertisement---

शिरीष मोरे यांच्या दुर्दैवी निधनाने वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. शिरीष महाराज यांनी पाच फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. संत तुकाराम महाराजांच्या वंशातील व्यक्तीने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करावी, ही अत्यंत दुःखद बाब आहे.

शिरिष महाराजांच्या  निधनानंतर कुटुंबावर मोठं संकट कोसळलं होतं, अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत मदतीचा हात दिला आहे.  एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबियाला ३२ लाखांची मदत केलीय.

शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमधून आर्थिक विवंचना किती गंभीर स्वरूपाची होती, हे स्पष्ट होतं. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला अशा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणे ही चिंताजनक बाब आहे.

शिरीष मोरे यांनी आपण कुणाचे किती पैसे घेतले आहेत याची माहिती त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिली होती. शिरीष मोरे यांच्या आत्महत्येनं मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीमुळे मोरे कुटुंबियांवर असलेलं कर्जाचं ओझं कमी होणार आहे. समाजकार्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलेल्या शिरीष महाराजांच्या पश्चात मोरे कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिला.

आमदार विजय शिवतारे यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली ३२ लाखांची रक्कम मोरे कुटुंबियांना देण्यात आली. केल्यानं वारकरी सांप्रदयासह सर्वांनाच धक्का बसला होता.

शिवव्याख्याते आणि संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज शिरीष मोरे यांचं लग्न अवघ्या काही दिवसांवर होतं. मात्र त्याआधीच त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येआधी शिरीष महाराजांनी आपल्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख सुसाइड नोटमध्ये केला होता. तसंच माझं कर्ज फेडण्यासाठी मित्रांनी कुटुंबियांना मदत करावी असंही आवाहन केलं होतं.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment