---Advertisement---

भुसावळ मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल; झेलम एक्सप्रेस ‘या’ तारखेपर्यंत रद्द

by team
---Advertisement---

भुसावळ : महाकुंभ मेळाव्यानिमित्त रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून जाणाऱ्या काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. तसेच, जम्मू तावी स्थानकावरील पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शनसंदर्भातील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे झेलम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मार्ग बदललेल्या गाड्या

गाडी क्र. १५०१७ (लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्स्प्रेस)

तारीख: १८ फेब्रुवारी

नवा मार्ग: इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी मार्गे गोरखपूर

गाडी क्र. ११०७१ (लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस)

तारीख: १७ फेब्रुवारी

नवा मार्ग: बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, जौनपूर मार्गे वाराणसी

हेही वाचा:  लग्नाचा आनंद गोंधळात बदलला! थाटामाटात वरात निघाली अन् वधूचा पहिला नवरा मंडपात आला आणि सगळं…

 गाडी क्र. १५०१८ (गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्स्प्रेस)

तारीख: १७ आणि १८ फेब्रुवारी

नवा मार्ग: बाराबंकी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस

 गाडी क्र. ११०७२ (वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस)

तारीख: १७ आणि १८ फेब्रुवारी

नवा मार्ग: जौनपूर, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, बीना मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस

या गाड्या  रद्द:

गाडी क्र. ११०७७ (पुणे-जम्मूतावी एक्स्प्रेस)

रद्द कालावधी: १७ फेब्रुवारी ते ४ मार्च

गाडी क्र. ११०७८ (जम्मूतावी-पुणे एक्स्प्रेस)

रद्द कालावधी: १९ फेब्रुवारी ते ६ मार्च

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी नियोजन करताना या बदलांचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment