---Advertisement---

‘छावा’ चित्रपट महिलांसाठी आठवडाभर मोफत; ‘या’ आमदाराने घेतला निर्णय

by team
---Advertisement---

‘छावा’ हा हिंदी चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला आहे, जो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसुबाईंची भूमिका निभावली आहे. अक्षय खन्ना यांनी औरंगजेबाची भूमिका केली आहे, आणि अजय देवगण यांनी व्हॉईसओव्हर दिले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 ‘छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून, त्याच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात हाऊसफुल आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली आहे आणि त्याची कमाई १०० कोटींच्या पुढे गेली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना हे चित्रपटाच्या  प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा:  Jalgaon News: अंत्ययात्रेदरम्यान अनपेक्षित घटना; नातेवाईक घाबरले अन् रस्त्यातच सोडला मृतदेह… नेमकं काय घडलं ?

 नगर शहर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी खास सर्वसामान्य महिलांसाठी मल्टीप्लेक्स थेटरमध्ये मोफत चित्रपट पाहण्याची सोय केली आहे. याने सर्व महिलांना चित्रपटाचा मोफत लाभ घेता येणार आहे. हा चित्रपट महिला सोमवारपासून ते रविवार पर्यंत मोफत पाहू शकतात. तसेच ‘छावा’ चित्रपट हा कर मुक्त करावा अशी मागणीही आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.

चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या दिवशी ३३.१ कोटी, दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ४८.६ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ‘छावा’ चित्रपटाचा नेटफ्लिक्सवर ओटीटी स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले असून, काही महिन्यांनंतर तो ओटीटीवर उपलब्ध होईल.

या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येही ५ कोटींचा व्यवसाय केला आहे, आणि त्याने अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment