---Advertisement---

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा पारा वाढला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण

by team
---Advertisement---

राज्यात उष्णेतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भातील तापमान झपाट्याने वाढत असून, उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे.

मंगळवारी रत्नागिरी येथे ३८.६ अंश सेल्सिअसतापमानाची नोंद झाली. हे तापमान आज देशातील सर्वाधिक होते. त्यामुळे राज्यात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. राज्यातील किमान तापमानातही वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. सांगली, सोलापूर, जेऊर, परभणी येथेही तापमानाने उच्चांक गाठला आहे.

हवामानाचा अंदाज आणि बदलते स्थिती

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रायलसीमापासून दक्षिण छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रियझाला आहे. यामुळे देशातील कमाल तापमान झपाट्याने वाढत आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमान सतत वाढत असून, नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे.

राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहू शकते. काही तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तापमान आणखी वाढण्याचा अंदाज

राज्यात कमाल आणि किमान तापमान वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता असून, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment