भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या काही गाड्या रेल्वे प्रशासनाने विविध कारणांमुळे रद्द केल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
रेल्वे प्रशासनाने खालील गाड्या त्यांच्या प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे –
गाडी क्रमांक ०१०२७ – दादर-गोरखपूर विशेष – ता. २५ रोजी रद्द
गाडी क्रमांक ०१०२८ – गोरखपूर-दादर विशेष – ता. २४, २५ आणि २७ रोजी रद्द
गाडी क्रमांक ११०५९ – लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्स्प्रेस – ता. २५ रोजी रद्द
गाडी क्रमांक ११०६० – छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस – ता. २४ आणि २७ रोजी रद्द
गाडी क्रमांक १९०४५ – सुरत-छपरा एक्स्प्रेस – ता. २४ आणि २६ रोजी रद्द
गाडी क्रमांक १९०४६ – छपरा-सुरत एक्स्प्रेस – ता. २५, २६ आणि २८ रोजी रद्द
गाडी क्रमांक ११०५५ – लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस – ता. २५, २६ आणि २७ रोजी रद्द
गाडी क्रमांक ०१०२५ – दादर-बलिया विशेष – ता. २६ आणि २८ रोजी रद्द
गाडी क्रमांक २०९६१ – उधना-बनारस एक्स्प्रेस – ता. २५ रोजी रद्द
गाडी क्रमांक २०९६२ – बनारस-उधना एक्स्प्रेस – ता. २६ रोजी रद्द
गाडी क्रमांक ११०८१ – लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस – ता. २६ रोजी रद्द
गाडी क्रमांक ११०८२ – गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस – ता. २८ रोजी रद्द
मार्ग बदललेल्या गाड्या आणि नवीन मार्ग
गाडी क्रमांक २२१३२ – बनारस-पुणे एक्स्प्रेस – ता. २६ रोजी
नवीन मार्ग: बनारस, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे पुणे
गाडी क्रमांक २०९३४ – दानापूर-उधना एक्स्प्रेस – ता. २६ रोजी
नवीन मार्ग: वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे उधना
गाडी क्रमांक १८६०९ – रांची-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस – ता. २६ रोजी
नवीन मार्ग: वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस
गाडी क्रमांक ११०६१ – लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्स्प्रेस – ता. २५ आणि २६ रोजी
नवीन मार्ग: इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसी मार्गे जयनगर
गाडी क्रमांक ११०३३ – पुणे-दरभंगा एक्स्प्रेस – ता. २६ रोजी
वीन मार्ग: इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसी मार्गे दरभंगा
गाडी क्रमांक २०९३३ – उधना-दानापूर एक्स्प्रेस – ता. २५ रोजी
नवीन मार्ग: इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसी मार्गे दानापूर
गाडी क्रमांक ११०६२ – जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस – ता. २५ आणि २६ रोजी
नवीन मार्ग: वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस
प्रवाशांनी प्रवासापूर्वी तपशील तपासावा
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुचित केले आहे की, प्रवासापूर्वी रेल्वेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अधिकृत रेल्वे वेबसाइट किंवा स्थानिक रेल्वे स्टेशनशी संपर्क साधावा. अचानक झालेल्या रेल्वे रद्दतीमुळे अनेक प्रवाशांना आपल्या नियोजित प्रवासात बदल करावे लागू शकतात.