---Advertisement---

ईशा यक्ष महोत्सव प्रारंभ, प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे गायन

by team
---Advertisement---

isha yaksha festival: कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्र येथे आयोजित यक्ष महोत्सव हा भारतीय कलांचे वैशिष्ट्य, शुद्धता आणि विविधता जपण्याचा आणि प्रोत्साहित करण्याचा एक प्रयत्न आहे. त्या अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रात संगीत, नृत्य आणि संस्कृतीने संपन्न अशा वार्षिक तीन दिवसीय यक्ष महोत्सवात गायन सादर करणार आहे. यंदा २३ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रतिष्ठित ईशा महाशिवरात्री उत्सवापूर्वी हा महोत्सव आयोजित केला जातो. यात जगप्रसिद्ध कलाकार आपली कला सादर करतात.

‘यक्ष’ हा आध्यात्मिक प्रयत्नांसाठी अविभाज्य असलेली स्थिरता आणि हालचाल, ध्वनी आणि शांतता साजरी करणारा एक उत्सव आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजे संगीतातील योगदानासाठी लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त राहुल देशपांडे आपली कला सादर करतील.

या वर्षी महोत्सवाची सुरुवात कर्नाटकातील आघाडीचे संगीतकार आणि कला प्रकारांचे युवा राजदूत सिक्किल गुरुचरण यांच्या सादरीकरणाने झाली. ५१ व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट समकालीन जॅझ अल्बमसाठी नामांकित त्यांचे सादरीकरण या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे एक वेगळी छाप सोडली.

तर २५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध नृत्यांगना मीनाक्षी श्रीनिवासन यांच्या भरतनाट्यम सादरीकरणाने या महोत्सवाचा समारोप होईल, ज्यामुळे रात्रभर चालणाऱ्या महाशिवरात्रीच्या उत्सवात एक उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.

गेल्या काही वर्षांत यक्षमध्ये पंडित जसराज, उस्ताद सईदुद्दीन डागर, परवीन सुलताना, कौशिकी चक्रवर्ती आणि संदीप नारायण यांसारख्या दिग्गज शास्त्रीय कलाकारांचा समावेश होता. गेल्या वर्षी, पंडित संजीव अभ्यंकर यांच्या हिंदुस्तानी शास्त्रीय गायनावरील प्रभुत्वाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

गृहमंत्री अमित शहा राहणार उपस्थित

२६ फेब्रुवारी रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ईशा येथे होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सद्गुरूंच्या उपस्थितीत आयोजित रात्रभर सुरु असणाऱ्या या महोत्सवात जगभरातील लाखो लोक प्रत्यक्ष आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे सहभागी होतील. या उत्सवात सद्गुरूंचे प्रभावशाली ध्यान आणि प्रसिद्ध कलाकारांचे नेत्रदीपक संगीत सादरीकरण समाविष्ट असेल.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment