मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत एकूण सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यामध्ये न्यायव्यवस्था, वित्त, पुनर्वसन, नियोजन, कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
दरम्यान राज्यात गेलं काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे . 18 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदांची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडचा पालकमंत्र्यांना स्थगिती देण्यात आल्याने महायुतीत नाराजी असल्याच्याबोललं गेलं .दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पदाचा तिढा दोन दिवसात सुटेल असं आश्वासन दिलं आहे.
हेही वाच : आनंदाची बातमी! राज्य शासनाकडून ‘नमो किसान सन्मान निधी’त वाढ; शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार…
काय म्हणाले गिरीश महाजन ?
राज्यातील पालकमंत्री पदांचा तिढा लवकरच सुटेल, अशी माहिती भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते म्हणाले, “रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांबाबत काही प्रश्न आहेत, पण पुढील दोन-तीन दिवसांत हा तिढा सुटेल. पालकमंत्री नसल्याने अनेक बैठका घेण्यात अडचणी येत आहेत, विशेषतः नियोजन समितीच्या बैठका. मात्र, कुंभमेळ्याच्या नियोजनात कुठेही ढिलाई नाही.”
महाजन यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. पालकमंत्र्यांची नियुक्ती लवकर झाल्यास त्याचा अधिक फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नाशिक कुंभमेळ्यासंदर्भात उद्या दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. विमानतळ आणि रेल्वे व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही महाजन यांनी सांगितले. तसेच, राज्य मंत्रिमंडळातील ८० टक्के कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.