---Advertisement---

संतापजनक! २२ दिवसांच्या बाळाला ६५ वेळा गरम विळ्याचे चटके, जन्मदात्रीचे निर्दयी कृत्य

by team
---Advertisement---

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. केवळ २२ दिवसांच्या नवजात बाळाला गरम विळ्याने तब्बल ६५ वेळा चटके दिल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरुवातीला या घटनेला गावातील एका भोंदूबाबाचा हात असल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांच्या तपासात या प्रकारामागे कोणताही तांत्रिक किंवा मांत्रिक नव्हता, तर जन्मदात्रीच होती. पोलीस तपासात आईनेच नवजात बाळाला गरम विळ्याचे चटके दिल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

गंभीर म्हणजे बाळाला पोटफुगीचा त्रास असल्यामुळे घरगुती उपाय म्हणून विळा तापवून 65 वेळा चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेत अडकलेल्या आईने उपचाराऐवजी या क्रूर पद्धतीचा अवलंब केला. परिणामी, बाळावर प्रचंड शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाला.

या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.

बाळाच्या प्रकृतीत कोणताही सुधार दिसत नसल्याने त्याला तातडीने पुढील उपचारांसाठी नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाळाच्या शरीरावर गंभीर जखमा असून, त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अंधश्रद्धेमुळे निष्पाप बाळावर असे अत्याचार होणे अत्यंत संतापजनक असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment