महायुती सरकारने 2022 मध्ये सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांना याचा लाभ मिळत होता.
आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होतं. मात्र या योजनेला अखेर ब्रेक लागला आहे. नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला वगळण्यात आल्याचं दिसून आलं.
हेही वाचा : ऑनलाइन ‘डाएट प्लॅन’ फॉलो केला अन् 18 वर्षीय तरुणीने फिटनेसच्या नादात जीव गमावला
आनंदाचा शिधा या योजनेत गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून 100 रुपयात एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ आणि एक किलो साखर दिली जात असे. यामुळे गरीब कुटुंबे सण आनंदाने साजरा करत होते, मात्र आता ही योजना बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार नाही. याचा फटका हजारो कुटंबांना बसणार आहे.
योजना बंद करण्यामागचं कारण अस्पष्ट
राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी जवळपास 1 कोटी 60 लाख पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा दिला जात होता. यासाठी प्रत्येक सणाला 350 कोटींचा खर्च येत होता.
हे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आली आहे यांनी निवडणुकी पुर्वी अनेक योजनाचा अक्षरशा पाऊस पाडला होता कर्जमाफी दिली नाही , लाडकी बहीण योजना निवडणुकी पुर्वी डोळे लावून दिली आता त्याच योजनेला निकष लावण्यात आले , शेत मालाला भाव नाही आणि नुसते हिंदुत्व म्हणजे सगळ नाही त्यामुळे या सरकार कडे ठोस उपाय योजना अशा काहीच नाहीत पाच वर्ष काढून घ्या आणि वरचे आणि खालचे दोघांना घरी पाठवा