---Advertisement---

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ता व गो सेवक बापूराव मांडे यांचे निधन, उद्या हरिपुरा येथे अंत्यसंस्कार

by team
---Advertisement---

भुसावळ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, माजी जिल्हा कार्यवाह तथा श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, पालक गोविज्ञान अनुसंधान केंद्र हरिपूरा मोहराळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांचे रविवारी पहाटे 5.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर सोमवार, 17 रोजी सकाळी आठ वाजता हरिपुरा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

हरिपुरा येथे होणार अंत्यसंस्कार

श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, धर्म जागरणचे प्रांताचे कार्य करणारे सोनु भाऊ अर्थात महेंद्र प्रभाकर मांडे यांचे बापूराव मांडे हे वडिल होते. त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार तसेच संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, मुक्ताई शिशू मंदीर जिजामाता प्राथमिक विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय हिंदूसभा न्यास, भुसावळ तसेच आश्रमशाळा हरिपुरा, गोविज्ञान केंद्र हरिपूरा असा मोठा परिवार आहे.

हरिपूरा हीच आपली कर्मभूमी समजून त्यांनी त्या ठिकाणी खडकाळ असलेल्या जमिनीवर नंदनवन फुलविले व आपला निवासही हरिपूरा येथेच केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment