---Advertisement---

‘बरं झालं पक्ष फुटला…’ असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे, जाणून घ्या

by team
---Advertisement---

खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीवर मोठ विधान केलं आहे. बरं झालं पक्ष फुटला, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तसेच त्यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाताली राष्ट्रवादीची आढावा बैठक होती. या बैठकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे. मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. ते या पक्षात असते आणि मी या पक्षात असते तर एक तर ते तरी राहिले असते किंवा मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करू शकत नाही. . सगळया दुनियेला माहीत आहे. माझी लढाई त्यांच्याबरोबर ते पक्षात असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोलले नाही, पण संघटनेत आहे म्हणून बोलते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

जो पुरुष स्वत:ची बायको..

जो पुरुष स्वत:ची जी बायको, जी आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर… एक तर तो पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करू शकणार नाही. तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट बोलले. मी माईकवरही बोलेल. मी नाही कुणाला घाबरणार. मी असली फालतू लढाई करत नाही. मी विरोधी पक्षात आयुष्य घालवेल, पण नैतिकता सोडणार नाही. मला नकोय ते कंत्राटदाराचे पैसे. माझं घर काही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर चालत नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.

शब्द दे सुप्रिया तू मला…

संतोष भाऊच्या आईला भेटा, बायकोला भेटा. महादेव मुंडेंच्या बायकोला भेटा. काय चूक केली त्यांनी? त्यांच्याकडे मुलांना लेकरं म्हणतात. आपण मुलं म्हणतो. महादेव मुंडेंची बायको विचारते, माझ्या लेकरांची चूक काय उत्तर द्या? काय उत्तर देणार? आणि मग जेव्हा संतोष भाऊच्या घरी गेले. त्यांच्या आईने माझा हात धरला. म्हणाल्या, तू मला न्याय देणार का? शब्द दे सुप्रिया तू मला न्याय देशील, असंही त्या म्हणाल्या.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment