आठवड्यातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. ग्रीन झोनमध्ये सुरुवात केल्यानंतर, सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांक वादळी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स ३४१ अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर निफ्टी ११२ अंकांच्या वाढीसह बंद झाला.
बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स ७३,८३०.०३ च्या पातळीवर उघडला आणि व्यवहारादरम्यान ७४,३७६.३५ च्या पातळीवर पोहोचला. तथापि, बाजार बंद होईपर्यंत, ३४१.०५ अंकांच्या वाढीसह ७४,१६९.९५ वर बंद झाला. त्याचप्रमाणे, निफ्टी देखील २२,३५३.१५ वर उघडल्यानंतर २२,५७७ वर पोहोचला आणि शेवटी ११२.४५ अंकांच्या वाढीसह २२,५०९.६५ वर बंद झाला.
कोणते शेअर्स वधारले ?
NACL इंडिया शेअर १९.९९% , ELGI इक्विपमेंट्स १६.८०%, बजाज फिनसर्व्ह शेअर ३.५९% , एम अँड एम शेअर २.४१%, अॅक्सिस बँक २.३६%, बजाज फायनान्स शेअर १.९०%, अदानी पोर्ट्सचा शेअर १.६३%, व्होल्टास शेअर ४.१६%, मुथूट फायनान्स शेअर ४.०९%, वाढीसह बंद झाले, तर ने वाढून बंद झाला.