जळगाव : जुन्या वादातून दोन गट परस्परास भिडले. चापटाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार शस्त्राने वार केल्याने दोन जण जखमी झाले. शनिवारी (15 मार्च) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना आझादनगर चौकात घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनुसार आठ जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अहेमद शेख कद्दुबुद्दीन शेख (वय 20, रा. ख्वॉजानगर, पिंप्राळा हुडको) या तरुणाच्या तक्रारीनुसार अहेमद मित्रासोबत चौकात उभा होता. या ठिकाणी दिनेश मनोज अहिरे, गोल्या उर्फ रहेमान खान मेहमूद खान उर्फ राज मनोज अहिरे, नारायण राजूभाई मारवाडी यांच्यासह चौघे आले.
जुन्या वादाचे कारण पुढे करीत संशयितांनी दोघांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोघांनी काहीतरी धारदार शस्त्राने वार केले. एकाने लोखंडी पाइप मारून दुखापत केली. दुसऱ्या गटाचे रेहानखान मेहमूद खान उर्फ गोल्या उर्फ राज मनोज अहिरे (वय 21, रा. आझादनगर) या तरुणाच्या तक्रारीनुसार आवेश शहा, अहेमद शेख तसेच त्याचे दोन साथीदार ( रा.ख्वॉजानगर) हे चौकात आले. जुन्या वादाचे कारण पुढे करत संशयितांनी रेहानखानवर धारदार हत्याराने वार करत दुखापत केली. या प्रकरणी हवालदार राजेश चव्हाण हे तपास करीत आहेत.
Jalgaon Crime News: जुन्या वादातून दोन गट परस्परात भिडले, धारदार शस्त्राने वार
by team
Published On: मार्च 17, 2025 6:26 pm

---Advertisement---
---Advertisement---