---Advertisement---

आनंदोत्सव! तब्बल 9 महिन्यानी सुनीता विल्यम्स मायभूमीत परतल्या, अवघं जग भारावलं

by team
---Advertisement---

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या आहेत. अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर 9 महिने 14 दिवसांनी पृथ्वीवर परतले आणि अवघं जग त्यांच्या घरवापसीने भारावून गेलं.

आज 9 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 वाजता त्यांचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरले. सुनीता विल्यम्स यांच्या सोबत अजून दोन सहकार्याही परतले आहेत. अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव अशी त्यांची नावे आहेत.

18 मार्च रोजी सकाळी 08:35 वाजता अंतराळयान बाहेर पडले, 10:35 वाजता अंतराळयान ISS पासून वेगळे झाले. 19 मार्च रोजी पहाटे 2:41 वाजता अवकाशयानाचे इंजिन कक्षेतून विरुद्ध दिशेला उडवले गेले. यामुळे अंतराळयानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि पहाटे 3:27 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) गेले केले. ही मोहीम केवळ 8 दिवसांची अपेक्षित होती. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हीलियम गळती आणि इतर तांत्रिक अडचणी आल्या ज्यामुळे त्यांचे परतीचे वेळापत्रक लांबले. हा प्रवास 8 दिवसापासून 9 महिन्यापर्यंत पोहोचला. या दरम्यान त्यांनी अवकाशात अनेक संशोधन, प्रयोग केले.


आठ दिवसांचा प्रवास नऊ महिन्यांवर

गत वर्षी ५ जून २०२४ रोजी, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले होते. मोहीम केवळ ८ दिवसांची असण्याची अपेक्षा होती. परंतू, प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे त्यांच्या पृथ्वीवरील परतीचा प्रवास लांबणीवर पडला होता. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोइंग आणि नासाच्या 8 दिवसांच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर गेले. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाच्या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर ये जा करणाऱ्या क्षमतेची चाचणी करणे हा होता. अंतराळवीरांनाही अवकाश स्थानकावर 8 दिवसांत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. परंतु थ्रस्टरच्या खराबीनंतर, त्यांचे 8 दिवसांचे मिशन 9 महिन्यांहून अधिक झाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment