---Advertisement---

घनदाट केसांचा मोह पडला महागात; रामबाण औषधीच्या नादात 65 जण थेट रुग्णालयात

by team
---Advertisement---

व्यक्तीच्या सौंदर्यात भर पाडण्यात केसांची भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे आपले केस घनदाट तसेच चमकदार व्हावे असे प्रत्यकाला वाटते मात्र सध्याच्या परिस्थिती टक्कल पडण्याची समस्या अनेकांना उद्भवत आहे. या समसेवर मात करण्यासाठी औषधोपचाराचे आमिष देऊन फसवणुकीचे प्रकार वाढीस आले आहे.

अश्याच फसवणुकीला बळी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एक दोन नव्हे तर चक्क ६५ जण बळी पडले असून त्यांना थेट रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. हा प्रकार पंजाबमध्ये सुरू होता. पण या औषधांना टकल्यावर केस न येता डोळेच्या दृष्टीच जाण्याची वेळ आली आहे.

पंजाबमधील संगरूर येथे टक्कल पडण्याच्या उपचाराच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेला एक शिबिर लोकांसाठी एक समस्या बनली आहे. संगरूर येथील काली देवी मंदिरात आयोजित या शिबिरात हजारो लोक टक्कल पडण्यावर उपचार करण्यासाठी पोहोचले, परंतु औषध लावल्यानंतर काही तासांतच त्यांच्या डोळ्यांमध्ये गंभीर संसर्ग सुरू झाला.

ज्यांच्या डोक्यावर हा लेप लावण्यात आला. अचानक त्यांच्या डोळ्यात जळजळ सुरू झाली. काहींना तर डोळे उघडले तरी अस्पष्ट दिसायला लागले. एका मागून एक सर्वच जण तक्रार करायला लागल्याने मग सर्वांनाच संगरूर सिव्हिल हॉस्पिटल आणि बर्नाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रशासनाकडून कारवाई

संगरूरचे डीएसपी सुखदेव सिंह म्हणाले, “आम्हाला तक्रार मिळाली होती की खन्ना येथील एक व्यक्ती टक्कल पडण्याच्या उपचारासाठी संगरूरला आला होता. हे शिबिर तेजिंदर पाल सिंग यांनी आयोजित केले होते, ज्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या व्यक्ती अमनदीप सिंगचा शोध सुरू आहे.

पीडिताची कहाणी

तक्रारदार सुखबीर सिंह म्हणाले, “मी सोशल मीडियावर या शिबिराबद्दल ऐकले आणि उपचारासाठी गेलो. तिथे एकाच ब्रशने सर्वांच्या डोक्यावर मेंदीसारखे लेप लावण्यात आले. संध्याकाळपर्यंत माझ्या डोळ्यांना जळजळ होऊलागली , मला डोकेदुखी होऊ लागली आणि माझी त्वचा खराब झाली. आता मी माझा चेहराही दाखवू शकत नाही. माझे नुकसान झाले आहे, परंतु अशा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी जेणेकरून इतरांना वाचवता येईल.” सुखबीरवर संगरूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी शिबिरात वापरल्या जाणाऱ्या औषधाची चौकशी सुरू केली आहे. पीडितांची संख्या ६५ पेक्षा जास्त झाली आहे आणि अनेक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. बनावट उपचारांच्या नावाखाली लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचे हे एक गंभीर उदाहरण बनले आहे. प्रशासनाने लोकांना अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment