---Advertisement---
सोयगाव : जालना-जळगाव रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. निधीचीही तरतूद झाली आहे. या कामाचे हवाई सर्वेक्षण करून भूसंपादन होणार असलेल्या जमिनीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीम ध्ये येणाऱ्या गट, सर्व्हे क्रमांक यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी धास्ती घेतली आहे. याच धास्तीमुळे हरिद्वार पार्क येथे राहणाऱ्या रामधन दलसिंग बैनाडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या वृत्ताने जनता भयभीत झाली आहे. जालना-जळगाव रेल्वे मार्गात येणाऱ्या जमिनींचे भूसंपादन सुरू होणार असल्याने भूसंपादनात ज्या ज्या ठिकाणी लोकवस्त्या, राहते घर, प्रार्थनास्थळे येत असतील त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, जालना-जळगाव रेल्वे म ार्गाच्या भूसंपादनाबाबत अनेक अफवा पसरवण्यात येत असल्याचे समजते. हवाई सर्व्हेनुसार रेल्वे बोर्ड कामकाज करीत आहे. हेप्रत्यक्ष सर्वेक्षण नाही.
प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू, तसेच संबंधित रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात ज्या ज्या ठिकाणी लोकवस्त्या, राहते घर, प्रार्थनास्थळे जात असतील त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. भूसंपादनाबाबत अंतिम आराखडा होईल त्यावर निश्चितपणे चर्चा होईल, त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.