---Advertisement---

Train schedule : प्रवास होणार सोयीस्कर! साप्ताहिक विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

by team
---Advertisement---

भुसावळ : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी पुढील गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

बलसाड-दानापूर साप्ताहिक विशेष गाडीला २३ जून २०२५ पर्यंत तर दानापूर-बलसाड साप्ताहिक विशेष गाडी ०१ जुलै २०२५ पर्यंत म दतवाढ मिळाली. उधना-पटना साप्ताहिक विशेष गाडीला २७ जून २०२५ पर्यंत तर पटना-उधना साप्ताहिक विशेष गाडीला २८ जून २०२५ मुदतवाढ मिळाली राजकोट-मेहबूबनगर साप्ताहिक विशेष गाडीला ३० जून २०२५ पर्यंत तर मेहबूबनगर-राजकोट साप्ताहिक विशेष गाडीला ०१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. बांद्रा टर्मिनस-रिवा अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी २६ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली तर रिवा-बांद्रा टर्मिनस अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी २७ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तिकीट बुकिंग सुविधा


अनारक्षित कोचसाठी तिकिटे युटीएस मोबाईल अॅप तसेच तिकिट खिडकीवरून उपलब्ध असतील. या गाड्यांसाठी अतिजलद मेल/एक्सप्रेस शुल्कासह अनारक्षित प्रवास करता येईल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment