डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ३२२ अंकांनी घसरून बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २७ टक्के परस्पर टॅरिफ जाहीर केले आहे. यामुळे आयटी, ऑटो, मेटल आणि तेल आणि वायू शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. दुसरीकडे, फार्मा, युटिलिटी, पॉवर आणि टेलिकॉम शेअर्समध्ये वाढ झाली.
बीएसई सेन्सेक्स ३२२.०८ अंकांनी घसरून ७६,२९५.३६ वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी ८२.२५ अंकांनी घसरून २३,२५०.१० वर बंद झाला.

कोणते शेअर्स वधारले ?
आजच्या व्यवहारात पॉवर ग्रिडमध्ये सर्वाधिक ४.३४ टक्के वाढ दिसून आली. यानंतर, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि एशियन पेंटचे शेअर्स या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
कोणते शेअर्स घसरले ?
टीसीएस,टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टाटा मोटर्सचे या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.