अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २७ टक्के परस्पर टॅरिफ जाहीर केले आहे. सोप्या भाषेत जर समजायचं झालं,तर त्यांच्या धोरणानुसार,जे देश अमेरिकन उत्पादनांवर जास्त शुल्क लावतात, त्यांच्यावरही प्रतिउत्तर म्हणून समान कर लावला जाईल. या धोरणामुळे भारतावर 26% रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्यात आले आहे. त्याचा थेट परिणाम देशातील शेती, कापड, वाहन क्षेत्रावर दिसून येईल.
रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय?
टॅरिफ हा एक प्रकारचा कर आहे, जो देशाने आयात केलेल्या वस्तूंवर लादला जातो. त्याचा मुख्य उद्देश सरकारसाठी महसूल वाढवणे आणि देशांतर्गत कंपन्यांना परदेशी स्पर्धेपासून संरक्षण देणे आहे. रेसिप्रोकल टॅरिफ (जशास तसा कर ) जे देश अमेरिकन उत्पादनांवर जास्त शुल्क लावतात, त्यांच्यावरही प्रतिउत्तर म्हणून समान कर लावला जातो.
सरकार त्याचा वापर व्यापार धोरण आणि महसूल संकलनाचे साधन म्हणून करते. उदा. जर भारताने अमेरिकन वस्तूंवर ३० टक्के टॅरिफ लादला, तर अमेरिका देखील भारतीय वस्तूंवर २० टक्के टॅरिफ लादेल. त्याचा उद्देश व्यापार असंतुलन कमी करणे आणि देशांतर्गत बाजारपेठेचे संरक्षण करणे आहे.
ट्रम्प यांनी टॅरिफला एक शस्त्र बनवले
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची व्यापार तूट कमी करण्यासाठी आणि इतर देशांना अमेरिकन वस्तूंवर जास्त शुल्क लादण्यापासून रोखण्यासाठी प्रतिशोधात्मक टॅरिफचा वापर केला आहे. त्यांनी हे निष्पक्ष व्यापाराचा हवाला देत अंमलात आणले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्या देशाने अमेरिकन आयातीवर जास्त शुल्क लादले तर अमेरिका त्या देशाच्या आयातीवरही तोच टॅरिफ लादेल.
भारताच्या जीडीपीवर काय परिणाम होईल
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के परस्पर शुल्क लादले आहे. यामुळे भारताच्या जीडीपीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर ट्रम्प म्हणाले की हे टॅरिफ परस्पर आहेत, म्हणजेच ते इतर देशांनी अमेरिकन उत्पादनांवर लादलेल्या शुल्कांना प्रतिसाद म्हणून आहेत.