Jalgaon Crime News : पंधरा वर्षीय मुलीवर वेळोवेळी संशयिताने अत्याचार केला. या प्रकारातून मुलगी गरोदर राहीली. शुक्रवार (४ एप्रिल) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिने एका नवजात अर्भकास जन्म दिला. या प्रकरणी संशयित गणेश अशोक बोरसे याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला. (Jalgaon Crime News) संशयिताने पीडितेवर आठ महिन्यापूर्वी शेत नाल्याजवळ अत्याचार केला होता. संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, तपास उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.
लाल त्रिकोणी बंगल्यामध्ये सुरु होता देहविक्री व्यवसाय
नंदुरबार : निझर रस्त्यावरील एका त्रिकोणी बंगल्यात सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली. (Nandurbar Crime News) या प्रकरणात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांसह ११ जणांना ताब्यात घेण्यात आले.
निझर रस्त्यावरील लाल/त्रिकोणी बंगल्यामध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पथकांनी छापा टाकला असता बंगल्यात देहविक्री व्यवसाय चालू असल्याचे आढळले. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांसह ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ५ हजार ६५० रुपये किमतीचे मद्य, गुटखा व इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव हे करीत आहेत.
नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोउपनि अमोल देशमुख, पोउपनि रविंद्र पवार, तसेच स्था.गु.शा. व उपनगर पोलीस ठाण्याचे पुरुष व महिला स्टाफ यांनी ही कारवाई केली.