जळगाव : अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी काळवीट आणि दोन हरणांचा मृत्यू (Deer death news) झाल्याची घटना समोर आली आहे. दुसरीकडे विहिरीत पडलेल्या एका हरणाला वाचवण्यात यश आले आहे.
अमळनेर ( Amalner news) टाकरखेडा- जळगाव मार्गावर शासकीय गोदामाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षाचे हरीण मृत्युमुखी पडले. अपघातात हरणाच्या पोटातील पिल्लाचाही मृत्यू झाला. तसेच दोधवद येथे देखील एक ८ महिन्यांचे काळवीट शेतात मृत्युमुखी पडलेले आढळून आले.
जुनोने तेथे तीन महिन्यांचे हरणाचे पिल्लू विहिरीत पडले होते. चेतन समाधान धनगर आणि दुर्वा आनंदा धनगर या दोघा तरुणांनी विहिरीत उडी मारून त्याचे प्राण वाचवले आहेत. वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे, वनरक्षक सुप्रिया देवरे, वनमजूर अधिकार पारधी, प्रवीण पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील यांनी या हरणावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले. तर मृत हरणांवर जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कडक उन्हाळ्यामुळे पाण्याच्या शोधात हरणे वणवण भटकत आहेत. जुनोने शिवारात रविवारी दुपारी जंगलात आग लागल्याने हरणे पळत सुटली असावीत आणि लहान पिल्लू विहिरीत पडले असावे. तालुक्यात चार दिवसांत चार हरणांचा मृत्यू झाला आहे.