Stock Market : आज ७ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. या घसरणीने गुंतवणूकदारांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. विशेषतः नवीन गुंतवणूकदारांना या घसरणीचा मोठा फटका बसला आहे. एका झटक्यात भारतीय बाजार १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे निफ्टी २२००० च्या आधार पातळीच्या खाली गेला आहे. हे बाजार गंभीर संकटात सापडल्याचे लक्षण आहे. प्रश्न असा आहे की गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही गुंतवणूक करण्याची एक उत्तम संधी आहे. अशी संधी ५-१० वर्षांतून एकदा येते. २०२० च्या सुरुवातीला मार्चमध्ये अशी संधी आली होती, जेव्हा कोविड महामारीने दार ठोठावले होते. ज्या गुंतवणूकदारांनी त्यावेळी बाजारात गुंतवणूक केली होती, ते आज चांगल्या नफ्यात आहेत. अनेक गुंतवणूकदारांचे पैसे ७-८ पट वाढले आहेत. ७ एप्रिलची घसरण ही गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी आहे. घाबरण्याऐवजी त्यांनी या संधीचा फायदा घेण्याचा विचार करावा.
हेही वाचा : अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, जळगावातील घटना
ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजय कुमार म्हणाले, “जगभरात शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणानंतर काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. सध्या तरी गुंतवणूकदारांसाठी वाट पाहणे हेच धोरण सर्वोत्तम राहील.” दुसरीकडे, मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णुकांत उपाध्याय म्हणतात की बाजारातील अस्थिरता अल्पावधीतही कायम राहू शकते. अशा परिस्थितीत, दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे.
व्हीएसआरके कॅपिटल गे चे संचालक स्वप्नील अग्रवाल म्हणाले की, गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. पहिले म्हणजे, ट्रम्प यांचे टॅरिफ जास्त काळ टिकणार नाहीत. दुसरे म्हणजे, भारत तुलनेने मजबूत स्थितीत आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेला भारताची निर्यात फार जास्त नाही. भारताच्या जीडीपीमध्ये त्याचा वाटा फक्त २ टक्के आहे. तिसरे म्हणजे, ट्रम्प यांच्या परस्पर टॅरिफबाबत भारत अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. लवकरच या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये करार होण्याची अपेक्षा आहे.