---Advertisement---

कासोदा पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी, गुन्ह्याचा २ ४ तासांत तपास करून दोषारोप पत्र दाखल

by team
---Advertisement---

केदारनाथ सोमाणी, प्रतिनिधी
कासोदा, ता. एरंडोल : पोलीस दलाचे कार्य फक्त कायदा-सुव्यवस्था राखणे नसून, समाजात सुरक्षा आणि न्यायाचे भान निर्माण करणे हेदेखील त्यांचे कर्तव्य असते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 100 कलमी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलीस दलाकडून वेगवान व कार्यक्षम तपासास अधिक प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे कासोदा पोलीस स्टेशनच्या कार्यशैलीने जळगाव जिल्ह्यात घडवलेला एक अभूतपूर्व विक्रम. गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 24 तासात तपास करून थेट न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणारे कासोदा हे पोलीस ठाणे जिल्ह्यात पहिले पोलीस ठाणे ठरले आहे.

3 एप्रिल 2025 रोजी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये एक गंभीर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा एका पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आला. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे आणि कासोदा पोलीस स्टेशनने याचे ज्वलंत उदाहरण घालून दिले.

फिर्याद दाखल होताच तपास अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश निर्मला दत्तात्रय खोंडे यांनी तत्परतेने तपासकार्य सुरू केले. 24 तासांच्या आत, गुन्ह्यातील चारही आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींविरोधात योग्य पुरावे गोळा करण्यात आले आणि तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर कायद्याचे भान ठेवून सुसूत्रता राखण्यात आली. त्यानंतर दोषारोपपत्र थेट न्यायालयात दाखल केले. या कार्यपद्धतीमुळे कासोदा पोलीस स्टेशन हे जळगाव जिल्ह्यातील पहिले पोली ठाणे ठरले ज्यांनी दाखल गुन्ह्याचा तपास केवळ 24 तासांत पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

तपासाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंग चंदेल, कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश राजपूत मार्गदर्शन लाभले. तपासामध्ये दाखल अमलदार नरेंद्र पाटील, तपास अमलदार पो.हे.कॉ. राकेश खोंडे, श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे गुन्ह्याचा तपास अत्यंत प्रभावी आणि जलदगतीने पूर्ण करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment