---Advertisement---

Raver Crime News : कत्तलीसाठी जाणाऱ्या १० गोवंशाची पोलिसांकडून सुटका; बोलेरो पिकअप जप्त

by team
---Advertisement---

Cow rescued by police : बोलेरो पिकअपमधून कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या दहा गोवंश जातीच्या गुरांची रावेर पोलिसांनी सुटका केली. अहिरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली तर आरोपीविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई मध्यप्रदेशातून एका वाहनातून गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्दे श दिले.

पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील व सहकाऱ्यांनी रविवारी रात्री अहिरवाडी गाठले. पहाटे अडीचच्या सुमारास मध्य प्रदेशाकडून बोलेरो पिकअप गाडी येताना दिसताच तिला अडवण्यात आले. वाहनात ९३ हजार रुपये किंमतीच्या सहा गायी व चार वासरांची निर्दयतेने वाहतूक केली जात होती. पोलिसांनी खानापूर गोशाळेत गोवंशाची रवानगी केली. बोलेरो पिकअप गाडी (एम.एच.०४ एफ.यु.६२१७) पोलिसांनी जप्त केली.

दोघांविरोधात गुन्हा दाखल

याबाबत रावेर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत आरोपी आरोपी रायसिंग ऊर्फ भाया रामसिंग अजनाडे व आकाश शांताराम आवले ऊर्फ बारेला (लालमाती) यांच्याविरुद्ध गुन्हा रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण करीत आहेत.




Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment