---Advertisement---

Jalgaon Crime News : जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन दुचाकी लंपास

---Advertisement---

जळगाव : शहरातून दुचाकी लांबविण्याच्या घटना थांबता थांबेना. घरासमोरून, जी. एस. मैदानावरून आणि हॉस्पिटलसमोर लावलेली, अशा तीन दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. या प्रकरणी शहर, जिल्हापेठ आणि रामानंदनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

व्यावसायिक भावेश मांगीलाल जैन (वय ३५, रा. जयकिसनवाडी) यांनी २० मार्चला रात्री दुचाकी (एमएच १९, एडब्ल्यू ७०७२) जयकिसनवाडी भागातील नवजीवन मंगल कार्यालयाजवळील राहत्या घरासमोर लावली होती. चोरट्यांनी ती लंपास केली. ही घटना २१ मार्चला सकाळी सहाच्या सुमारास समोर आली. भावेश जैन यांनी सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला असता, मिळून आली नाही. याप्रकरणी तक्रारीनुसार शनिवारी (५ एप्रिल) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार भास्कर ठाकरे तपास करीत आहेत.

हॉस्पिटलसमोरून दुचाकी लंपास

शेख शाकीर शेख युसूफ (वय ३६, अक्सानगर, मास्टर कॉलनी) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. १२ डिसेंबर २०२४ रोजी ते साडेनऊच्या सुमारास त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९, ईसी ६६४४) दुचाकीने शहरात विश्वप्रभा हॉस्पिटल येथे आले. समोर दुचाकी लावून ते कामाला गेले. दहाच्या सुमारास ते आले असता, त्यांची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी तक्रारीनुसार शुक्रवारी (४ एप्रिल) रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक हेमंत कळसकर तपास करीत आहेत.

गेटच्या आतून नेली दुचाकी

विकास प्रकाश लखवाल (वय ३१, रा. सोनापवाडी, ता. सिल्लोड) हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते दुचाकीने (एमएच २०, एफएल ६६६२) शुक्रवारी (४ एप्रिल) रात्री जळगाव शहरात आले. रात्री नऊच्या सुमारास ही दुचाकी त्यांनी जी. एस. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये लावली. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास ते आले असता, त्यांना दुचाकी गायब झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment