जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते व विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी नुकतेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेय. दरम्यान, भाजप नेत्यांवर आरोप केल्याशिवाय खडसे यांना माध्यमं विचारत नाही. त्यामुळे राजकारणात जिवंत राहण्यासाठी खडसे हे आरोप करत असून, ते केवळ प्रसिद्धी मिळवून घेत असल्याची टीका भाजपचे सरचिटणीस अरविंद देशमुख यांनी केली. तसेच ”बाप दाखवावा, नाही तर आरोप साध्य करावे”, असे आव्हानही त्यांनी खडसेंना दिलं आहे.
आमदार एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर केलेल्या गंभीर आरोपांवरून सध्या जिल्ह्याचं राजकारण तापलं असून, दररोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. काल सोमवारी (ता. ७) बोदवड येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला शेण फासून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आज मंगळवारी, जळगाव शहर भारतीय जनता पार्टीतर्फे जीएम फॉउंडेशन येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हा महिलांचा अवमान
खरं तर खडसे यांनी हे आरोप करून महिलांचा अवमान केला आहे. कारण खडसे यांच्या घरातील महिलादेखील (मंत्री रक्षा खडसे) मंत्रीपदावर असून, त्या चांगलं नेतृत्व करत आहेत. खडसे यांच्याकडे काही पुरावे नसून ते केवळ प्रसिद्धीसाठी हे आरोप करत आहेत. त्यामुळे खडसे यांनी कुणावर आरोप करण्याअगोदर पुराव्यानिशी माध्यमांसमोर जावं, असा सल्लाही अरविंद देशमुख यांनी या वेळी खडसेंना दिलाय.
खडसे पुरावे सादर करणार का?
खडसे यांनी ”बाप दाखवावा, नाही तर आरोप सिद्ध करावे”, असे आव्हान अरविंद देशमुख यांनी खडसेंना दिलं आहे. त्यामुळे आता आमदार एकनाथ खडसे या संदर्भात काय भूमिका जाहीर करतात? याकडे लक्ष लागून आहे.
बोदवडात खडसेंच्या प्रतिमेला फासलं शेण
बोदवड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी नुकतेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेय. हे आरोप बिनबुडाचे असून, खडसे यांच्यात ऐकही गुण नाही. खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत येथील भारतीय जनता पार्टीने खडसेंच्या प्रतिमेला शेण फासून निषेध व्यक्त केला. बोदवड भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाच्या कार्यालयात काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत घेण्यात आली. या वेळी एकनाथ खडसे हे जेष्ठ नेते असून, त्यांच्या सारख्या जैष्ठ नेत्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून, ते तथ्यहिन आहे. महाराष्टाचे मुख्यमंत्र्याची स्वप्न पाहणारे खडसे यांच्यात ऐकही गुण मुख्यमंत्र्याचा नाही, अशी टीका करत खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.