---Advertisement---

Dharangaon News : नगरपरिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाची 50 टक्के रक्कम अदा 

by team
---Advertisement---

Dharangaon municipal council employees : नगरपरिषदेमध्ये सन 2016 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक  भिकन पारधी लेखाधिकारी श्रीपाद मोरे प्र.अस्थापना प्रमुख सिकंदर पारधी व प्र रोखपाल मुजम्मिल शेख  पुढाकाराने संबंधित कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाच्या 50 टक्के रकमेचा अदा करण्यात आली आहे.

सदर रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील प्रलंबित लाभ म्हणून देण्यात आली असून, त्यामुळे अनेक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

मुख्याधिकारी श्री. झंवर यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करताना कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या अंमलबजावणीस प्राधान्य दिले आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच हा निर्णय वेळेत व यशस्वीरीत्या अमलात आणता आला.

याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी रामराव भदाणे, रघुनाथ कोळपे, दिलीप पाटील, अरुण बयस,भगवान मिस्त्री, दीपक चौधरी, प्रवीण देशपांडे, योगराज तळेगाव, आदि सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment